संगमनेर (DSNews24/किरण पुरी) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवडणूक झाली आहे. कारखान्याच्या चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा संपुर्ण तालुक्यात रंगली होती.
मात्र अखेर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तसेच व्हा. चेअरमनपदी पांडुरंग घुले यांची निवड करण्यात आली.
