संगमनेर ( DSNews24/ किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील जिल्हा बँकेच्या शाखेतील रेंज गायब झाल्याने संपूर्ण बॅंकेचे कामकाज ठप्प झाले आहे. तसेच बॅंकेत येणाऱ्या ग्राहक, शेतकऱ्यांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मागील तीन दिवस बॅंक बंद असल्याने मंगळवारी सकाळी सकाळी बॅंकेत व्यवहार करण्यासाठी शेतकरी, ग्राहकांनी गर्दी केली होती. मात्र सकाळपासून रेंजच नसल्याने तारांबळ उडाली आहे. तसेच बॅंकेबाहेरच शेतकरी रेंज कधी येईल याची वाट पाहत बसले आहे. तरी तातडीने बॅंक प्रशासनाने यावर उपाय काढावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
