विद्या प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाचाही १०० टक्के निकाल

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षी 100 टक्के निकालाची परंपरा असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील साकुर येथील विद्या प्रबोधिनी विद्यालयाने यावर्षी देखील आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विशेषतः विद्यालयातील 90 ते 100 मध्ये पाच विद्यार्थी, 80 ते 90 मध्ये सतरा विद्यार्थी, 60 ते 80 दरम्यान अडोतीस विद्यार्थी तसेच 35 ते 60 दरम्यान सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

तसेच शेलार मृणाल दिलीप 96.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिला क्रमांक पटकावला आहे. व केंद्रातही प्रथम क्रमांक मिळविला आहे. पटेल ऐमन राजु 94.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. डोके कार्तिकी जितेंद्र हिने 93.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच गागरे साई नंदकुमार याने 92.80 टक्के मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. व ठाणगे पायल दादाभाऊ हिने 90.80 टक्के मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत अशोकराव पा. खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव पा. खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर व संचालक मंडळ तसेच संस्थेचे रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर सर, प्राचार्य गुलशन जमादार मॅडम, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment