मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. उत्साह व उमेद वाढेल.
वृश्चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
धनु : हितशत्रुंचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कुंभ : शासकीय क्षेत्रात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मीन : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
