पुणे – कोकण किनारपट्टीवर पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरच्या घाट परिसरातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांना यलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहराला उद्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, हलक्या पावसाची शक्यता आहे.
