मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : हितशत्रूंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
कन्या : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनू : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.
कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
