मुंबई : आमदार आणि नागरिकांची वर्दळ असणाऱ्या विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. 19 मे) दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही कोणतीच दुखापत झाली नाही. पण यामुळे विधानभवनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण, विधानभवनाच्या सुरक्षेसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो, मात्र अचानक घडलेल्या आगीच्या घटनेमुळे विधानभवनाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर विधानभवनाच्या रिसेप्शन एरियात जी स्कॅनिंग मशीन असते त्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली
