अकोले – मुळा खोर्यात पाऊस कोसळत असल्याने या नदीवरील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबित तलाव काल मंगळवारी दुपारी 1 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे, या तलावातून 150 ते 200 क्युसेकने नदीत विसर्ग सुरु आहे.
आता खाली मुळा नदी वाहती झाली असून हे पाणी पिंपळगाव धरणात जमा होऊ लागले आहे. अकोले तालुक्यातील मुळापाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे यामुळे मुळा नदी वाहती झाली असून या नदीवरील आंबित धरण काल मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले आहे.
मुळा नदी उगमा जवळ आंबित गावात असणारे मुळा नदीवरील आंबित धरण असून नगर जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाळ्यात भरणारे आंबित धरण हे पहिले धरण आहे. मान्सून पूर्व दमदार एन्ट्रीने अकोले तालुक्यातील हे पहिले धरण भरले आहे.
