मुंबई – राज्यात तिसऱ्या अवकाळी पावसाने 14 जिल्ह्यांना फटका बसला असून 28 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात आठ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात 7 हजार 305 हेक्टरवर नुकसान झाले.
अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच मका, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाच्या पहिल्या टप्प्यात 4 ते 9 मार्च दरम्यान झालेल्या गारपीटीने 15 जिल्ह्यांमध्ये 38 हजार 606 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालं होतं.
त्यानंतर 15 ते 21 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 1 लाख सात हजार हेक्टरी पिकांच नुकसान झाले आहे. तर आता तिसऱ्या अवकाळी पावसामध्ये 28 हजार 287 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं अंदाज कृषी विभागाला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले?
जिल्हा हेक्टर
रत्नागिरी 45
रायगड 50
सिंधुदुर्ग 37
नाशिक 8003
धुळे 29
जळगाव 53
पुणे 3
अहमदनगर 7305
सातारा 47
बीड 2762
धाराशिव 2856
बुलढाणा 114
अकोला 5859
नागपूर 7
