मंत्री विखे पाटील म्हणाले, मविआचे नेते भविष्यात एकमेकांवर मूठ….

स्वातंत्र्यवीर सावकरांचा काॅग्रेस नेत्यांकडून होत असलेला अपमान उध्दव ठाकरे शांतपणे बघत असल्याचे आश्चर्य वाटते. सतेसाठी विचार सोडणाऱ्या उध्दव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओक असल्याने स्व;ताचे मत व्यक्त करण्याचे धैर्य देखील त्यांच्यात राहीले नसल्याची टिका महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

अहमदनगर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील
म्हणाले की, राज्यात आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू असल्यातरी,ही वज्रमूठ केव्हा सैल होईल यांना कळणार नाही. महाविकास आघाडीत सुरू झालेले मतभेद पाहाता तीन पक्षांचे नेतेच भविष्यात एकमेकांवर मूठ उगारल्या शिवाय राहाणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

वज्रमूठ सभांवर टिका करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही त्यामुळे ते अशा वज्रमूठ सभा घेत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सता गेल्याने वैल्यग्रस्त झाले असून, उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल आता सिल्वरओकवर असल्याने ते स्वताचे मतही आता मांडू शकत नाहीत.

महाविकास आघाडीने प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा सल्ला देत विखे म्हणाले की,महाविकास आघाडी फक्त व्यक्तिद्वेषाने पछाडली आहे. खालच्या पातळीवर जावून टीका करण्याचे काम त्यांच्याकडून होत असून, स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर टीका करणारे राहुल गांधी यांच्या करिता आता मातोश्रीवर लाल कार्पेट टाकण्याची तयारी सुरू आहे. सावकरांवरील टिका सहन करत त्यांच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरे सभा घेत बसणार असतील तर हे कुठले हिंदुत्व ? असा सवाल मंत्री विखे पाटील यांनी केला.

Leave a Comment