मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुळ : तुमच्या कार्क्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मकर : शत्रुपिडा नाही. वाहने जपून चालवावीत.
कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
