संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मौजे जांभुळवाडी व मौजे साकूर ता.संगमनेर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत असल्या तरी महसुली सजा एकच असल्याने जांभुळवाडीचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण करण्याची नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची जुनी मागणी होती. महसुली सजा स्वतंत्र नसल्याने अनेक प्रशासकीय अडचणी येत होत्या. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली जांभुळवाडी गावाचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण केल्याची माहिती आमदार अमोल खताळ पा.यांनी दिली आहे.तसेच सदर अधिसुचना अप्पर जिल्हाधिकारी श्री.बाळासाहेब कोळेकर यांनी प्रसिद्ध केली आहे.
या निर्णयामुळे साकूर या महसुली गावाचे साकूर व जांभुळवाडी या दोन स्वतंत्र महसुली गावांत विभागणी झाली असुन जांभुळवाडी या गावाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळणार आहे. तसेच जांभुळवाडी हद्दीतील साकूर मध्ये समाविष्ट असलेले भुमापन क्रमांक वगळुन नव्याने जांभुळवाडी मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
या निर्णयाचे जांभुळवाडी परिसरातुन मोठ्या प्रमाणात स्वागत होत असुन 40 वर्षांचा प्रश्न 100 दिवसांत मार्गी लावल्याने पठारभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर,बुवाजी पा.खेमनर, भाजपा अध्यक्ष गुलाबराजे भोसले, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, मच्छिंद्र खेमनर, युवराज खेमनर, नागेश कोळेकर, संतोष खेमनर, मन्सुर पटेल, बाळासाहेब दिनकर खेमनर ई.कार्यकर्ते व नागरिकांनी आमदार अमोल खताळ पा.व पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

साकुर ग्रामपंचायत मधून जांभुळवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत झाली मात्र त्याला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळावा यासाठी शंकर पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त गावकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि हे श्रेय गावकऱ्यांचे असून कोणत्याही पुढार्याचे नाही त्यामुळे खोटी पत्रकबाजी करू नये करू अशी परखड प्रतिक्रिया या कामी पाठपुरावा करणारे सरपंच अण्णासाहेब कुदनर यांनी दिली आहे.
नुकतीच जांभुळवाडी गावाला स्वतंत्र महसुली दर्जा प्राप्त झाला या कामासाठी गावचे सरपंच अण्णासाहेब कुदनर, ॲड देवराम चोरांबले,या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून जांभुळवाडी गाव हे स्वतंत्र झाले आहे यापूर्वी या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळण्याकरता तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता स्वतंत्र गाव झाले असून याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मात्र गावात बातमी येण्यापूर्वीच श्रेय घेण्यासाठी काही लोकांनी परस्पर बातम्या प्रसिद्ध केल्या आहे. ज्यांना गाव माहिती नाही. ज्या पुढार्यांचे या गावात कोणतेही काम नाही. त्यांनी कधी आमच्या गावाकडे पाहिले नाही अशी मंडळी आता पत्रक बाजी करून या कामाचे श्रेय घेत आहे. त्यांचा काय संबंध