संगमनेर : डाळिंब बागेला औषध मारताना शेतकऱ्यासोबत घडली दुर्दैवी घटना

संगमनेर तालुक्यातील निळवंडे शिवारात शेतातील डाळिंब बागेला औषध मारत असताना इलेक्ट्रिक लाईटच्या तुटलेल्या तारेमुळे विजेचा धक्का बसून शेतकर्‍याचा मृत्यू झाला.

विजय साहेबराव पवार (वय 46) असे मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांचे नाव आहे. रविवार दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने निळवंडे गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment