खेमनर कुटुंबियांचे लोखंडे, विखे, खताळांकडून सांत्वन

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांभुळवाडी येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बुवाजी खेमनर यांचे बंधू सयाजी भागा खेमनर यांचं आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. सयाजी खेमनर हे शेती व मेंढपाळ करत होते. तसेच त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा गोड परिवार आहे. राजकारणात कायमच चर्चेत असलेले तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बुवाजी खेमनर यांचे सयाजी बंधू असल्याने त्यांच्या कुटुंबियांची विविध राजकीय मान्यवरांनी सांत्वन पर भेट घेतली.

नुकतेच शिर्डी लोकसभेचे माजी खासदार व शिंदे गटाचे नेते सदाशिव लोखंडे यांनी खेमनर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच या आधी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी देखील खेमनर कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी देखील विखे आणि खताळ यांनी आपुलकीने विचारपूस करत आस्थेवाईकपणे चौकशी केली होती.

या भेटीवेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, कृषी अधिकारी कारभारी नवले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बुवाजी खेमनर, ॲड. दिपकराव थोरात, सुभाष पा. खेमनर, शिंदे गटाचे तालूकाध्यक्ष रमेश काळे, शिवाजी क्षिरसागर, बंडु खेमनर, नागेश कोळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई निघूते, धनरग समाज राज्याचे नेते आण्णासाहेब बाचकर, खांबे गावचे सरपंच रविंद्र दातीर, खांबे सोसायटीचे माजी चेअरमन जव्हार कापडी, रामभाऊ जोशी, ज्ञानदेव दातीर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश तमनर, रऊफ शेख, मन्सूर पटेल, इसाक पटेल, सुभाष पेंडभाजे, अमृता कोळपकर, प्रियांका जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment