ब्रेकिंग! जयराम ढेरंगेंची “ती” पोस्ट चर्चेत, अखेर बाळासाहेब थोरातांची मध्यस्थी ठरली यशस्वी 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील जयराम ढेरंगे यांनी कॉग्रेसच्या असंघटित बांधकाम कामगारच्या तालूकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली होती. तसेच त्यांनी आपली खदखद DSNews24 च्या एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केली होती. त्यामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात एकच चर्चा रंगली होती. जयराम ढेरंगे हे पठार भागातीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांच्याकडे मराठा समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून बघितले जात आहे. ते त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पठार भागातील जनतेच्या प्रतिक्रियेतून स्पष्टपणे दिसून आले आहे. कारण साकूर गटातील बरेचसे गावे मराठा समाजाची आहे. त्यामुळे पठार भागात जातीय समीकरण निर्माण झाल्याची चिन्हे दिसू लागली होती. तसेच भविष्यातही हे जातीय समीकरण चिघळू नये यासाठी वरीष्ठांना यामध्ये विशेष लक्ष घालावं लागणार असल्याच चित्र आहे. त्यामुळे मात्र माजी मंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या विषयाकडे गांभिर्याने लक्ष घातले होते. जयराम ढेरंगे यांना तातडीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलावून घेत वस्तूस्थिती समजावून घेतली. तसेच जयराम ढेरंगे यांची सर्व नाराजी दूर केली. शेवटी अखेर बाळासाहेब थोरातांच्या मध्यस्थीने या प्रकरणावर पडदा पडला आहे. त्यानंतर जयराम ढेरंगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं काय म्हणाले पोस्टमध्ये वाचा जशीच्या तशी…..

*लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसचेच काम करणार*

— — *मी जयराम ढेरंगे* (साकुर) तमाम मायबाप नागरिक बंधू-भगिनींना, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना नम्रपणे सांगू इच्छितो की, मी संगमनेर तालुका बांधकाम कामगार अध्यक्ष पदाचा राजीनामा 01/04/2025 रोजी दिला होता. जनतेच्या विकास कामांच्या समस्यांबाबत काही विषय होते. याबाबत मी सोशल मीडिया मधून व्यक्त झालो होतो.

या संदर्भाने राज्याचे नेते *आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब* (मा. महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई) यांनी मला बोलावून सविस्तर चर्चा केली. पी ए बाबतही सविस्तर चर्चा झाली. यापुढे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सर्वच पि ए दखल घेतील. कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य जनतेला पि ए यांनी फोन न उचलल्यास थेट साहेबांना फोन करा असे साहेबांनी मला सांगितले आहे.

साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा तालुक्यातच नव्हे राज्यात आदर होतो आणि विरोधकही अगदी आदर सन्मान करतात एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असा साहेबांचा आदर प्रत्येकाच्या हृदयात आहे.

तेव्हा सर्व सामान्य जनतेला विनंती आहे की कोणाला काही अडचणी असल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षावर माझी कुठलीही नाराजी नाही यामुळे साहेबांबरोबर खूप सकारात्मक चर्चा झाल्यामुळे मी काँग्रेस पक्षात बरोबर आहे. हे मी आपल्याला स्पष्ट करत आहे.

कोणाचे काही यापुढे कामे असतील तर ती खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा

*आपला जनसेवक तथा ना. थोरात साहेबांचा निष्ठावंत सैनिक – जयराम ढेरंगे मो. 8600301655

Leave a Comment