सावधान! पुढील ४ दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना मोठा इशारा 

मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होतील. या बदलानुसार, गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्याला कधी ऑरेंज अलर्ट?

पुढील तीन ते चार दिवस कोकण, विदर्भात धो-धो बरसणार.

गुरुवार : अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली आणि कोल्हापूर.

शुक्रवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

शनिवार : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.

रविवार : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.

Leave a Comment