मांडवे बुद्रुक येथील ऑप्युलन्स स्कूलचा बारावीचा १०० टक्के निकाल ; साकूर केंद्रात दोन विद्यार्थ्यांनी अव्वल

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील उद्योजक बाबासाहेब कुटे यांच्या ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन विद्यालयाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल नोंदवला आहे. सलग सात वर्षाची 100 टक्के निकालाची परपंरा कायम राखत ऑप्युलन्स स्कलने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळ व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळ हा उल्लेखनीय निकाल साध्य झाला आहे. विद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी साकूर केंद्रात अव्वल क्रमांक मिळविला आहे. तसेच 15 पैकी 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

या वर्षीच्या निकालात कु. आर्या संतोषकुमार थोपटे हीने ७९.५० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. तसेच कु. स्वामीनी हौशीराम दिवटे हिने ७०.३३ टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला. तसेच चि. तन्मय अजित बागुल याने ६१ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला तर कु. ऋतुजा संजय ढेंबरे हिने ६०. ३३ टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक व कु. दिपाली रोहिदास दाते हिने ६० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला आहे. तसेच कु. आर्या थोपटे व कु. स्वामीनी दिवटे या विद्यार्थ्यांनींनी साकूर केंद्रात अव्वल क्रमांक मिळविला आहे.

मांडवे बुद्रुक येथे उद्योजक बाबासाहेब कुटे यांनी ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशनची आठ वर्षांपूर्वी निर्मिती केली.‌ या स्कूलमध्ये पठार भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास पुर्ण शिक्षण मिळावे यासाठी सर्व सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. अनुभवी शिक्षक या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. इयत्ता दहावी व बारावीच देखील शिक्षण या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मिळत आहे. बारावीची वाणिज्य व विज्ञान शाखा या स्कूलमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी या स्कूलमध्ये घडवला जातो. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते.

ऑप्युलन्स स्कूल साकूर पठार भागातील एकमेव असे विद्यालय आहे की दरवर्षी इयत्ता दहावी व बारावी बोर्डाचा निकाल 100 टक्के लागण्याची परंपरा आहे. यंदाच्या वर्षी देखील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे. विशेषतः उत्कृष्ट व अनुभवी शिक्षक वर्गाच्या मेहनतीमुळ हे शक्य होत आहे. या सर्व शिक्षक शिक्षिका तसेच बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच उद्योजक बाबासाहेब कुटे व प्राचार्या श्रीमती सुरेखा पवार कौतुक करत अभिनंदन केले आहे. तसेच दहावीच्या निकालातही हिच परंपरा कायम राखली जाईल अशी अपेक्षा प्राचार्या सुरेखा पवार यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment