कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका बसला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी तडकाफडकी राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीची गणितं पूर्णपणे बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक कॉंग्रेस अध्यक्ष अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, सिद्दरामया यांच्या उपस्थितीत आज बंगळुरूत जगदीश शेट्टार पक्षप्रवेश झाला.
तर “मी मनापासून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार, सिद्दरामया, रणदीप सुरजेवाला आणि एम. बी. पाटील यांनी माझ्याशी संपर्क केला होता. मी कोणताही विचार न करता येथे आलो आहे”, अशी प्रतिक्रिया यावेळी जगदीश शेट्टार यांनी दिली आहे.
