मेष : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मतांविषयी आग्रही राहाल.
कन्या : हितशत्रूंवर मात कराल. कोणालाही जामीन राहू नका.
तूळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्चिक : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
धनू : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
मकर : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
