संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील पटेल गल्लीत राहणाऱ्या सरदार बालम पठाण व पिरमोहमंद चांद शेख या दोघांचे चोरट्यांनी घरे फोडल्याची घटना आज मध्यरात्री घडली आहे. चोरट्यांनी एकाच वेळी दोन घरे फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी आहे की, साकूर येथील पटेल गल्लीत सरदार बालम पठाण व पिरमोहमंद चांद शेख या दोघांचे घरे आहे. तसेच काही दिवसांपासून या घरातील सदस्य बाहेरगावी कामानिमित्त राहत आहे. कधी कधीच ते या ठिकाणी येत असतात. त्यामुळे ही या दोघांची घरे कायमच बंद असतात.
मात्र याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरात उचकापाचक केली. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान चोरट्यांनी किती मुद्देमाल लंपास केला हे अद्याप समोर आले नाही.
