पारनेरच नाव अमेरिकेत झळकवणाऱ्या कन्येचा सत्कार

पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील काकणेवाडी येथील कन्या आदिती वाळुंज या अमेरिकेत भारत देशाच्या राजदूत म्हणून कार्यरत आहेत. आदिती वाळुंज यांच्यामुळे पारनेरच नाव थेट अमेरिकेत झळकले आहे.

तसेच आदिती हीचे नावलौकिक होत आहे. नुकतेच निलेश लंके प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांच्याशी आदिती वाळुंज यांची भेट झाली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कान्हुर पठार गावच्या सरपंच संध्याताई ठूबे , सूरज नवले पाटील, सनी सोनावळे, डॉ उदय बर्वे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आदिती वाळुंज यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment