पारनेर (DSNews24/किरण पुरी) टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून रेशनकार्ड कॅम्प अतिशय उत्साहात सुरू आहे. खरोखर या कॅम्पची प्रत्येक गावात गरज होती. गावोगावी या कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविंद्र राजदेव यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे पारनेरला जायचे हेलपाटे या कॅम्पमुळे वाचले आहे. रविंद्र राजदेव सर्वसामान्यांसाठी धावणारे व्यक्तीमत्व आहे. आज ते जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिपक अण्णा लंके यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रेशनकार्ड व बांधकाम कामगार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. कासारे येथील ग्रामस्थांसाठी आयोजित विशेष कॅम्पवेळी दिपक अण्णा लंके बोलत होते.
दरम्यान टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये आपली सेवा आपल्याच दारी हा अभिनव उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे
दरम्यान या कॅम्पमध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड online करणे, आधार कार्ड अपडेट करणे, बांधकाम कामगार कार्ड काढणे, नवीन मतदार नाव नोंदणी करणे, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड वरील नाव कमी करणे व दुरूस्ती करणे आदि सेवा दिली जाणार आहे. मात्र यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जाऊन उंबरठे झिजवावे लागतात. मात्र एका हेलपाट्यात काम होईल ही गॅरंटी देखील नसते मात्र विनाकारण एक दिवस वाया जातो. मात्र माजी सरपंच रविंद्र राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात कॅम्प राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी सर्व कामे करून मिळणार आहे.
विशेषतः या कॅम्पमध्ये आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच या कॅम्पला अक्षरशः महिला, पुरूष तसेच ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कॅम्पसाठी स्वयंसेवक मदत करत आहे. आपली सेवा आपल्या दारी या सेवेबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून रविंद्र राजदेव यांनी हा उपक्रम चालू केल्याबद्दल कौतुक केले आणि आभार मानले .
यावेळी कासारे गावचे सरपंच शिवाजीराव निमसे, सोसायटीचे चेअरमन तुळशीराम लगड, बंशीशेठ खरात, वसंतराव दातीर, आप्पाजी लगड, मिनिनाथशेठ पानमंद, पप्पूशेठ कासुटे, भगवान साळवे, भाऊ शिवाजी खरात, सखाराम नरड, पोपट नरड सर, जितेंद्र नरड, मा.सरपंच भानुदास आग्रे, रवी घोलप, भाऊसाहेब चौधरी, अमोल गाडगे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
