महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप….! मनसे – शिवसेना आज एकत्र येणार?

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या मनसे-शिवसेना (MNS) युतीबाबत आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युतीसंदर्भात चर्चा सुरू असून त्याला आता अधिकृत रूप मिळण्याची शक्यता आहे.

आज, २५ जून २०२५ रोजी मुंबईत दुपारी १२.३० वाजता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई सहभागी होणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ‘राज-उद्धव युती’ची अधिकृत घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी इंडिगो एअरलाईन्सच्या अंतर्गत ‘अजाईल’ कंपनीतील कर्मचाऱ्यांवरील अन्याय आणि सत्ताधाऱ्यांच्या ‘खोटारडेपणाचा’ पर्दाफाश करण्याचा मुख्य मुद्दा असल्याचे जाहीर केले आहे. मात्र दोन्ही पक्ष एकत्रितपणे माध्यमांसमोर येत असल्यामुळे युतीच्या चर्चांनाही नव्या दिशा मिळण्याची शक्यता आहे.

१८ जून रोजी दोन्ही पक्षांनी कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यात शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि मनसे नेते उपस्थित होते. या मुद्द्यावर एकत्र कारवाई करत असताना, युतीबाबतही ठोस निर्णय झाला आहे का, हे आज स्पष्ट होऊ शकते.

Leave a Comment