संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात संगत चांगली ठेवा. तसेच व्यसनाधीन मित्रापांसून दूर राहत आपल्यात काय आहे ते ओळखायला शिका. आई वडीलांसह गुरूजनांचा आदर करा. ज्ञान मंदिरात येताना आई वडीलांच्या पायाला स्पर्श करून या तुमच आयुष्य नक्कीच घडेल असा मौलिक सल्ला घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विरभद्र माध्यमिक विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती व अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कामगार पोलिस पाटील शिवप्रसाद दिवेकर, पो. कॉ. प्रमोद गाडेकर, पत्रकार किरण पुरी, प्राचार्य खरात बी एम, पर्यवेक्षक तुरकणे सर, खेमनर एस के, हजारे जी वाय, ढमढेरे डी बी, केदार व्ही एम, खेमनर एम ए,खेमनर जे बी,खेमनर डी के, पाडेकर सर आदि मान्यवर उपस्थित होते.
राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच विरभद्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गावातून प्रभात फेरी काढली.
थोरात पुढे बोलताना म्हणाले की, अंमली पदार्थामुळे विचार व वागणूकीवर परिणाम होतो. व्यसनाधीन लोक असं का करतात, हा प्रश्न नेहमी पडतो. जर घरातील एखादा व्यक्ती व्यसन करत असेल त्याला विचारा व्यसन का करता? तसेच तशी शपथ घेयला सांगा. विद्यार्थ्यांनी टिव्ही, मोबाईलकडे दुर्लक्ष करा. शाळेत शिक्षणासाठी येतो. त्यासाठी आपण सक्षम बनल पाहिजे. विद्यार्थ्यांनींनीही अभ्यास करून करिअर करा. करिअर आताच आहे नंतर नाही. आज एखादी चूक झाली तर ती पुन्हा भरून येत नाही. एखादी गोष्ट चूकीची घडत असेल तर मला कळवा त्याचा पुर्णपणे बंदोबस्त मी करीन त्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनींना हेमंत थोरात यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक/ सुत्रसंचलन हजारे जी वाय यांनी केले तर आभार प्रा. पाडेकर यांनी मानले. यावेळी गायकवाड सर, वीरकर सर, सोनवणे सरमधे मॅडम,शेख मॅडम,वाघुंडे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
