मायबाप जनतेच्या आशिर्वादाने लढायला बळ मिळाले – रविंद्र राजदेव 

पारनेर (DSNews24/किरण पुरी) लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत आहे. त्यामुळे त्यांचेच आशिर्वाद माझ्या पाठिशी असून मला आणखीन बळ मिळत आहे. जनतेसाठी मी सदैव सक्रिय राहणार आहे. प्रत्येक अडीअडचणीला त्यांच्यासाठी धावून जाणार आहे. मायबाप जनतेचेच आशिर्वाद माझ्या पाठिशी असून त्यांच्या पाठिशी अहोरात्र उभा राहणार असल्याचे प्रतिपादन निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून रेशनकार्ड कॅम्प अतिशय उत्साहात सुरू आहे. खरोखर या कॅम्पची प्रत्येक गावात गरज होती. गावोगावी या कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविंद्र राजदेव यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे पारनेरला जायचे हेलपाटे या कॅम्पमुळे वाचले आहे. रविंद्र राजदेव सर्वसामान्यांसाठी धावणारे व्यक्तीमत्व आहे. आज ते जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिपक अण्णा लंके यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रेशनकार्ड व बांधकाम कामगार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कर्जुले हर्या येथील ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते दिपक अण्णा लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये आपली सेवा आपल्याच दारी हा अभिनव उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान या कॅम्पमध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड online करणे, आधार कार्ड अपडेट करणे, बांधकाम कामगार कार्ड काढणे, नवीन मतदार नाव नोंदणी करणे, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड वरील नाव कमी करणे व दुरूस्ती करणे आदि सेवा दिली जाणार आहे. मात्र यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जाऊन उंबरठे झिजवावे लागतात. मात्र एका हेलपाट्यात काम होईल ही गॅरंटी देखील नसते मात्र विनाकारण एक दिवस वाया जातो. मात्र माजी सरपंच रविंद्र राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात कॅम्प राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी सर्व कामे करून मिळणार आहे.

विशेषतः या कॅम्पमध्ये आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच या कॅम्पला अक्षरशः महिला, पुरूष तसेच ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कॅम्पसाठी स्वयंसेवक मदत करत आहे. आपली सेवा आपल्या दारी या सेवेबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून रविंद्र राजदेव यांनी हा उपक्रम चालू केल्याबद्दल कौतुक केले आणि आभार मानले .

यावेळी पारनेर बाजार समितीचे माजी उप सभापती बापुशेठ शिर्के, निलेश लंके प्रतिष्ठानचे सुनिल मुळे, माजी सरपंच रामदास दाते, सुनिल दाते, शशिकांत आंधळे, गंगाराम उंडे, बबनशेठ आंधळे, सत्यम निमसे, दत्तात्रय आंधळे, हरिशेठ उंडे, बाळु कुटे, हरिचंद्र कोकाटे, रामदास उंडे, सुभाष वाफारे, काशिनाथ वाफारे, भानुदास आग्रे ,भाऊसाहेब चौधरी ,सुनील दाते ,रामदास साळवे ,रविंद्र घोलप ,मारुती आग्रे आदि मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment