पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील नांदूर पठार येथील नागरिकांसाठी मातोश्री हॉस्पिटल आयुर्वेद कॉलेज रिसर्च सेंटरचे डॉ दीपक आहेर यांच्या वतीने डोळे तपासणी तसेच सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत लाभ घेतला. या शिबीराचे आयोजन सचिन दाते यांनी केले होते.
यावेळी माधवशेठ आग्रे, बाळू मामा चौधरी, नरसू राजदेव, सेवा सोसायटीचे संचालक शंकरमामा आग्रे, जयराम चौधरी, गीताराम आग्रे, माजी चेअरमन जिजाराम पानसरे, सखाराम हनुमंत आग्रे, पांडा राजदेव, कारभारी घनदाट, रामभाऊ आहेर, कैलास आहेर, रंगनाथ राजदेव, सावकार गाढवे, मच्छिंद्र आग्रे, सदाशिव चौधरी, नामदेव देशमाने उपस्थित होते. तसेच शिबीरात सेवा देण्यासाठी डॉ संतोष घाणे, डॉ शीतल मॅडम, डॉ भाग्यश्री मॅडम उपस्थित होते.
