सावधान! पुढील 24 तास महत्त्वाचे, धडकी भरवणारा पावसाचा अंदाज 

राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत.

नदी-नाल्यांचा पाण्याचा स्तर धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत नाशिक घाट, पुणे घाट, रायगड आणि चंद्रपूर या भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे .विदर्भाला आज पावसाचा तीव्र अलर्ट देण्यात आले असून नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे . अमरावती, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय .

Leave a Comment