पारनेर (DSNews24/किरण पुरी) समता परिषदेने पारनेर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे. समता परिषदेच्या तालुका अध्यक्षपदाची धूरा निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी नवनाथशेठ खामकर यांच्या सोपवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
नवनाथ खामकर यांची पानोली गावचे युवा नेते म्हणून ओळख आहे. नुकतेच नवनाथ खामकर यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. सरपंच रविंद्र राजदेव मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच खामकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी नवनाथ खामकर यांचं भरभरून कौतुक केले. सत्कारवेळी पानोली गावचे सरपंच संदीप गाडेकर, मा.सरपंच शिवाजी शिंदे, मा.उपसरपंच प्रशांत साळवे, निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रवीण थोरात, शहाजी थोरात, सुनील गाडेकर, तुषार गाडेकर ,चंदू खेमनर उपस्थित होते.
