संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर शिवारातील पवार वस्ती येथे अंजनाबाई सदाशिव पवार (वय ७०) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना वार – सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांनी तातडीने आज पवार कुटुंबियाची भेट घेत सांत्वन केले.
तसेच घटना कशी घडली? याबाबत पवार परिवाराकडून माहिती घेतली. तसेच पवार कुटुंबियांना निलम खताळ यांनी धीर दिला. यावेळी भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य रउफ शेख, जिल्हा उपाध्यक्ष बुवाजी खेमनर, सुभाष भुजबळ, विकास पवार, सुनिल इघे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
