UPSC परीक्षेत संगमनेर – जामखेडच्या तिघांचा डंका

अहिल्यानगर(DSNews24/किरण पुरी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये अनेक तरुण तरूणींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातील देखील अनेक तरुणांना या परिक्षेत यश मिळाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून तीन जणांनी UPSC परिक्षेत घवघवीत यश संपादन मिळविले आहे.

यामध्ये संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील ऋतुजा अशोक गायकवाड आणि जोर्वे येथील धनंजय संजय दिघे, तसेच जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील निखिल काशिबा तांबे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.

IAS, IPS, IRS, IFS यांसह विविध केडरमध्ये उमेदवार निवडीसाठी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात देशाच्या गुणवत्ता यादीत ऋतुजा गायकवाड हिने 106 वा क्रमांक मिळविला. तसेच धनंजय दिघे 529 वा आणि निखिल तांबे यास 517 वा क्रमांक मिळाला. आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे हेच या तिघांनी या यशातून सिद्ध केल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment