अहिल्यानगर(DSNews24 /किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य रऊफ शेख यांनी जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकार्यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
नुकतेच जिल्हा प्रशासनात मोठे फेरबदल पहावयास मिळाले. जिल्हाधिकारीपदी डाॅ.पंकज आशिया तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आनंद भंडारी व जिल्हा पोलीस प्रमुखपदी सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्विकारला आहे.
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.रऊफ शेख यांनी या तीनही प्रमुख प्रशासकीय अधिकार्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांचे समवेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थींना पैसे मिळण्यात येणार्या अडचणींवर चर्चा केली. तसेच अनेक रेशनकार्ड धारकांना ठराव देऊनही अद्याप धान्य पुरवठा होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांनी संबंधित विभागाला सुचना केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे समवेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जावाढ करणे विषयी चर्चा रऊफ शेख यांनी केली. यावेळी श्री.भंडारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
जिल्हा पोलीस प्रमुख पदी नव्याने रुजु झालेले सोमनाथ घार्गे यांना रऊफ शेख यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.घार्गे यांनी देखील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आपल्या सुचनांचे स्वागत करु व आवश्यक ते सहकार्य करु असे आश्वासन दिले. पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे यांचे खंदे समर्थक तसेच संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे विश्वासु सहकारी म्हणुन रऊफ शेख यांची ओळख आहे. तसेच भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी वर सदस्य पदी काम करत असताना प्रशासकीय अधिकार्यांशी योग्य समन्वय साधत ते काम करत आहेत.
