विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, अधिवेशन काळात फक्त ‘या’ व्यक्तींनाच प्रवेश मिळणार 

मुंबई – विधानसभा अध्यक्षांनी काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे विधान भवन परिसरामध्ये अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर भूमिका घेत, हा निर्णय आज जाहीर केला.

विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार आता आमदारांच्या खासगी कर्मचाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अधिवेशन सुरु असताना विधिमंडळ परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. इतकेच नाही तर अधिवेशन काळात विधिमंडळातील सभागृहांमध्ये मंत्र्यांना बैठका न घेण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत. मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात या बैठका घ्याव्यात, असे देखील अध्यक्षांनी सांगितले आहे.

Leave a Comment