बिग ब्रेकिंग! ‘त्या’ दिवशी मी राजकारण सोडेल आणि….. सचिन खेमनर यांचं खळबळजनक वक्तव्य

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचा बिगुल वाजणार आहे. मात्र आरक्षण काय लागणार? हे अजूनही जाहीर झाले नसून लवकरच आरक्षणावर देखील शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. तसेच उमेदवारी मिळावी यासाठी आतापासूनच पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डींग लावली जात आहे. साकूर जिल्हा परिषद गटातून देखील कॉंग्रेस व भाजपकडून बरेचशे इच्छुक उमेदवारांनी तयारी केली आहे. नुकतेच अहिल्यानगर कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन खेमनर यांनी एका मुलाखतीत मी देखील स्वतः साकूर जिल्हा परिषद निवडणूकीसाठी दावेदार असल्याचे म्हटले आहे.

सचिन खेमनर पुढे बोलताना म्हणाले की, साकूर गटात २००८ पासून कॉंग्रेसचे एकनिष्ठ काम करत आहे. जिथे जिथे मला जबाबदारी दिली मी तालुक्यात, जिल्ह्यात काम केले. आमदार सत्यजित तांबे विधानपरिषदेच्या निवडणूकीत उमेदवार असताना त्या निमित्ताने महाराष्ट्रातही काही ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली. मात्र साकूर गटातील लोकांची, मित्रांची तसेच माझ्या नातेवाईकांची इच्छा आहे की मला जिल्हा परिषदेसाठी संधी मिळाली पाहिजे.

मात्र संधी देयची का नाही हा अधिकार सर्वस्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना असून ते ठरवतील. तसेच बाळासाहेब थोरात यांना जर वाटत असेल मी निवडून येण्यासारखा उमेदवार आहे तर निश्चितच मला उमेदवारी देतील. जर त्यांना सर्वेनुसार वाटत असेल मी योग्य उमेदवार नाही तर ते दूसऱ्याला उमेदवारी देतील, मात्र बाळासाहेब थोरात हे योग्य उमेदवार देतील आणि माझाही विचार करतील असा मला विश्वास असल्याचे सचिन खेमनर यांनी म्हटले आहे.

तसेच जरी माझा विचार केला नाही तरी देखील मी कॉंग्रेसचेच काम करणार आहे. तसेच साकूर गटात कॉंग्रेसचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा देखील यावेळी सचिन खेमनर यांनी केला आहे.

भाजपकडून जर तुम्हाला पंचायत समितीची संधी मिळाली तर तुम्ही काय करणार? या प्रश्नावर सचिन खेमनर यांनी वेळ आणि काळ ठरवेल असे मोजक्या शब्दात उत्तर दिले.

तसेच मी अठरा वर्षांपासून बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर काम करत आहे आणि इथून पुढेही काम करणार आहे. मात्र ज्या दिवशी मला वाटेल माझ्यावर योग्य न्याय झाला नाही त्या दिवशी मी राजकारण सोडेल आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेल. परंतु मी वेगळा विचार न करता माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्याबरोबरच काम करणार असल्याचे सचिन खेमनर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment