साकूर येथील जि.प.प्राथ.उर्दु शाळेस निलम खताळ यांनी दिली भेट

संगमनेर (DSNews24 ) तालुक्यातील साकूर येथे जि.प.उर्दु प्राथमिक शाळेस आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ.निलम खताळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली. यावेळी निलम खताळ यांनी संगणक कक्षाचीही पाहणी केली. साकूर येथे जि.प.च्या उर्दु प्राथमिक शाळेत ई.१ ली ते ८ वी पर्यंतचे वर्ग असुन ई.९ वी चे वर्ग सुरु करण्याची मागणी आहे.

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.रऊफ शेख यांनी यासाठी आमदार अमोल खताळ व पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या माध्यमातुन जि.प.कडे पाठपुरावा सुरु केला आहे. आज सौ.निलम खताळ यांनी या शाळेला भेट देत पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी सौ.निलम खताळ यांचे उत्साहात स्वागत केले. शाळेसाठी आवश्यक ते सहकार्य भविष्यात नेहमी देऊ अशी ग्वाही सौ.निलम खताळ यांनी आपले मनोगतात दिली.

यावेळी त्यांच्या समवेत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, सुभाषशेठ पेंडभाजे, संदीप खिल्लारी, सुभाष भुजबळ, अझहर पटेल, तुषार पेंडभाजे इ.कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तब्बसुम शेख, शिक्षिका शाहिदा चौगुले, नफीसा कुरणे व शिक्षक श्री.सलीम सर व मणियार सर, मुजाहिद शाह हे उपस्थित होते.

Leave a Comment