मांडवे खुर्द येथे आरोग्य शिबीर संपन्न

पारनेर( DSNews24/ किरण पुरी) तालुक्यातील मांडवे खुर्द येथे लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्रशेठ राजदेव यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर कॅम्पचे उद्घाटन सरपंच कैलास गागरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव, राजूशेठ गागरे, गौतम बागुल, नामदेव गागरे, निलेश लंके प्रतिष्ठान चे यशवंत जाधव, नामदेव आहेर, सोपान आहेर, रेवणनाथ गागरे, बबन जाधव, सुधीर जाधव, संतोष बागुल, ह भ प लक्ष्मण महाराज गागरे, दत्ताराम आहेर, कानिफनाथ क्षीरसागर, तुकाराम जाधव (सचिव), मंगल हरदे, नर्मदा भोर, हिरा गागरे, डॉ सुधाकर साळुंखे, डॉ बाबासाहेब चेडे, डॉ गणेश हनुमंते, डॉ पल्लवी शिंदे, गौरव बाचन, आरोग्यमित्र प्रवीण शिंदे उपस्थितीत होते. या शिबिरात अनेक रुग्णांनी सहभाग घेतला.

Leave a Comment