दौंड(DSNews24 /दिपक काकडे) महसूल विभागाच्या वतीने राज्यात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान हा महसूल सप्ताह राबवण्यात येत असून याअंतर्गत विविध उपक्रम देखील राबवले जाणार आहेत.
त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील दौंड येथे महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. प्रशासकीय इमारतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दुय्यम निबंधक गणेशजी ढाणे, लिपीक दैवशाला हिंगमिरे, शिपाई इनामके उपस्थित होते.
