अबब! खडकवाडीत बिबट्याने फोडली डरकाळी, नागरिकांमध्ये प्रचंड घबराट 

पारनेर ( DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील खडकवाडी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यातच भर दिवसा बिबट्याने डरकाळी फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी एक ते दोन बिबटे डोंगर परिसरातील प्रभाकर लहानु घेमूड यांच्या बाजरीच्या शेतात लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. अचानक दोन बिबटे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. बिबटे बाजरीच्या शेतात दबा धरून बसले असून याबातची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचा बिबट्याने बळी घेतल्याची घटना खडकवाडी शिवारातच घडली होती. भरदिवसा बिबटे मुक्त संचार करत असल्याचे चित्र असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. त्यामुळे तातडीने या मोकाट बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू रोकडे, भाऊसाहेब घेमूड, संदिप शिंदे, दत्ता गोत्राळ, अशोक शिंदे आदि शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment