संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील रऊफ शेख यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी ही निवड आज जाहीर केली आहे. रऊफ शेख हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांचे खंदे समर्थक व मा. खा.सुजयदादा विखे पा.यांचे निकटवर्तीय व आमदार अमोल खताळ पा.यांचे विश्वासु सहकारी मानले जातात.
यापुर्वी शेख यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस मध्ये विविध पदे भुषविली असुन 2019 साली त्यांनी मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला होता. डिसेंबर 2023 मध्ये रऊफ शेख यांना भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य पदी संधी देण्यात आली होती. या पदावर काम करत असताना रऊफ शेख यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सर्व जिल्हा त्यांनी पिंजुन काढला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना जिल्हाध्यपदी संधी देण्यात आली आहे.
रऊफ शेख यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड व्हावी यासाठी अकोले, संगमनेर पासुन ते रहाता, कोपरगाव, श्रीरामपुर, नेवासा पर्यंत सर्व तालुक्यातील अल्पसंख्यांक कार्यकर्ते आग्रही होते. रऊफ शेख यांच्या निवडीचे या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपाने रऊफ शेख यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे.
माझे मार्गदर्शक पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.,खा.सुजयदादा विखे पा. व माझे भक्कम आधारस्तंभ आमदार अमोलभाऊ खताळ पा.व आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेम व आशिर्वादाने आज माझी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. मी सर्वांचे मनापासुन आभार मानतो
रऊफ शेख
