मांडवे बुद्रुक येथील सोसायटीच्या नुतन इमारतीचा बाळासाहेब थोरातांच्या हस्ते शुभारंभ 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजली जाणाऱ्या मांडवे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुतन इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. इमारतीचे काम बघून बाळासाहेब थोरात यांनी सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले.

तत्पूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत वाजतगाजत स्वागत करण्यात आले. जवळपास ५६ लाख रुपये खर्च करून सोसायटीने सुसज्ज अशी इमारत उभी केली. त्यामुळे या इमारतीत सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.

यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे व्हाय चेअरमन पांडुरंग घुले, संगमनेर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिरा शेटे, जिल्हा बॅंकेचे संचालक गणपतराव सांगळे, उपनिबंधक संतोष कोरे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, प्रा. रामदास धुळगंड सर, नवनाथ अरगडे, विजय रहाणे, मांडवे बुद्रुक सोसायटीचे चेअरमन रूपेश धुळगंड, व्हा. चेअरमन कासम सय्यद, पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड. अशोक हजारे, जयराम ढेरंगे, शांताराम कढणे, मारूती केदार, विठ्ठल भागवत, विठु मैड तसेच सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव, सर्व संचालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment