घुलेवाडीत संग्राम महाराज भंडारे यांच्या किर्तनात घडला ‘हा’ प्रकार, आमदार अमोल खताळ यांचा मोठा इशारा

संगमनेर(DSNews24) संगमनेर तालुक्यात यापुढे कोणत्याही महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर महायुतीचे कार्यकर्ते त्या हल्लेखोरांचा जागेवरच बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आ. अमोल खताळ यांनी दिला आहे. तालुक्यातील घुलेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनात हिंदुत्वावर बोलणाऱ्या संग्रामबापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आ अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

घुलेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मध्ये बोलताना हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवघ्या काही मिनिटातच अफझल्याचा वध केला असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे माजी आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या गाडीची तोड फोड केली. या घटनेचा निषेध करताना आ खताळ म्हणाले, ही घटना निंदणीय आहे आपण या घटनेचा जाहीर निषेध करतो.

अखंड हरिनाम सप्ताहात संग्रामभंडारे महाराज यांनी अध्यात्माच्या माध्यमातून हिंदू धर्मावरती किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलत असताना अफजलखानाच्या नावाचा उल्लेख केला त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिरची झोबण्याचे काहीच कारण नव्हते . विधान सभा निवडणुकीत झालेला पराभव पचवता येत नसल्याने त्यांचे कार्यकर्ते महाराजांबर ही हल्ला करण्याचा प्रयत्न करत करत आहे. हा प्रकार निंदनीय आहे. संगमनेर तालुक्यात असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाही.या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.अशा सूचना पोलीस प्रशासनाला आपण दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसात गुन्हा गुन्हाही दाखल झालेला असल्याचे त्यांनी सांगितले.

संग्राम महाराज भंडारे यांच्यावरती काँग्रेसच्या काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्या बाबतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणास खूप वाईट वाटले. हिंदुत्वावर बोलत असणाऱ्या महाराजांवर जर तुमचे कार्यकर्ते हल्ला करत असेल तर ते आमचे कार्यकर्ते अजिबात सहन करणार नाही. तुम्ही ईव्हीएमवर किंवा मतदार यादीवर चर्चा करण्यापेक्षा तुमचा पराभव कशामुळे झाला याचे सर्वप्रथम आत्मपरीक्षण करा असा टोला आ. खताळ यांनी माजी आमदारांचे नाव न घेता लगावला. यावेळी घुलेवाडी येथील महायुतीचे शरद पानसरे, स्वरूप राऊत , विलास राऊत, स्वप्निल राऊत, संजय पानसरे सिताराम पानसरे रोशन प्रशांत राऊत, रोशन कोथिंमिरे, श्याम नाईक वाडी यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घुलेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांच्यावरती काँग्रेसच्या काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. हे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नका. सर्वांनी संयम राखा अशा सूचना आपण कार्यकर्त्यांना दिल्या असून सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी करण्यात येणाऱ्या रस्ता रोको आंदोलनालास माझा पाठिंबा राहील आणि या विकृतीचा निषेध करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहणार आहे

आमदार अमोल खताळ – संगमनेर विधानसभा

 

संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावागावात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. संग्रामबापू महाराज भंडारे यांचे तालुक्यात अनेक ठिकाणी कीर्तन झाले परंतु कुठेही असा प्रकार झाला नाही. घुलेवाडीत त्यांनी आपल्या कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महिमा सांगितला. औरंगजेबावर बोलल्यानंतर यांना का झोंबले असा प्रति सवाल करत काही जण संगमनेरचे वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही तर त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबतही निर्णय घ्यावा लागेल असा इशारा आमदार खताळ यांनी यावेळी दिला.

Leave a Comment