साईबाबांच्या नगरीत सुभाष डोंगरे उत्कृष्ट उपसरपंच पुरस्काराने सन्मानित 

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भिमाजी डोंगरे यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट उपसरपंच २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन यांच्या हस्ते हा पुरस्कार रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने देखील सुभाष डोंगरे यांना राष्ट्रीय आदर्श उपसरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होते. त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानने देखील उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्या कार्याची दखल घेत साईबाबांच्या पुण्यनगरीत उत्कृष्ट उपसरपंच २०२५ पुरस्कार देण्यात आला.

उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील घडामोडींवर वॉच ठेवण्यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. साईट गटारींची कामे करून घेतली. दळणवळणाच्या दृष्टीने सीमेंट काँक्रिटीकरण रस्ते, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, जिल्हा परिषद शाळेत सोलर बसविणे, प्राथमिक उप आरोग्य केंद्र चालू करणे, कचरा घंटा गाडी ग्रामपंचायतीसाठी, आरोग्य, डोळे, रक्तदान शिबीर आयोजन करणे असे विविध कामे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी करून घेतली. तसेच काही वेळा गावच्या विकासासाठी धडाडीचे निर्णय देखील घेतले.

तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुभाष डोंगरे यांनी पठार भागातील रस्त्यांविषयी आवाज उठवला. विजेच्या प्रश्नांसाठी महावितरण कार्यालयावर आंदोलन, उपोषण केले. त्याचबरोबर पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये वंचित गावांचा समावेश करण्यात यावा यासाठी तब्बल आठ दिवस आमरण उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सुभाष डोंगरे यांची पारनेर व संगमनेर तालुक्यात एक वेगळीच ओळख निर्माण झाली. सामाजिक प्रश्नांवर भूमिका बजावत असल्याने याच कार्याची दखल कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवाभावी संस्था व धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठाननं त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

सुभाष डोंगरे यांना उत्कृष्ट उपसरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, संगमनेर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे, थोरात कारखान्याचे माजी चेअरमन बाबा ओहोळ, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्या सह पठार भाग, संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment