अबब! मुंबईत पावसाचा हाहाकार, पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट 

मुंबई आणि कोकण किनारपट्टी सध्या जोरदार पावसाच्या कचाट्यात सापडली आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी मुंबई, ठाणे आणि कोकणातील इतर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे आणि कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका वाहतुकीला बसला आहे.

मुंबई, पुणे आणि कोकणासाठी रेड अलर्ट

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment