संग्राम म.भंडारे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात रास्तारोको, तुषार भोसलेंचा मोठा इशारा

संगमनेर(DSNews24 ) महाराष्ट्रामध्ये हिंदूधर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संग्रामबापू भंडारे यांचे किर्तन बंद करण्याचा काही जणांचा डाव हिंदुत्ववादी तरुणांनी उधळून लावला. येथून पुढे हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कीर्तनकार महाराजांवर हात टाकण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला जसेच्या तसे उत्तर दिले जाईल. घुलेवाडीत संग्राम बापू भंडारे महाराजांवर हल्ला करणाऱ्यांना अटक झाली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीने यापेक्षाही मोठा मोर्चा संगमनेरात काढला जाईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला.

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन सुरू असताना १४ जणांनी गोंधळ घालून महाराजांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी संगमनेर बस स्थानकावर सकल हिंदू समाजाच्या वतीने सुमारे दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले काय म्हणाले 

या रास्ता रोको आंदोलनास भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले आणि आमदार अमोल खताळ यांनी पाठिंबा दिला. त्यावेळी बोलताना भोसले म्हणाले की या तालुक्यातील एका माजी मंत्र्यांचे ४० वर्षाचे साम्राज्य उलथवून टाकत अमोल खताळ आमदार झाले त्यामुळेच ते अस्वस्थ झाले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून हिंदुत्वविषयी जागरण करून प्रबोधन केले गेले, म्हणून काँग्रेसचा या राज्यात पराभव झाला आहे. त्यामुळे अशा हिंदुत्ववादी महाराजांचे कीर्तन न होऊ देण्याचा डाव काँग्रेसचा आहे. मात्र हा महाराष्ट्र छत्रपतीं शिवाजी महाराज, संत ज्ञानोबा तुकोबाचा आहे. तुम्ही येथून पुढे जर कुठल्याही कीर्तनकार महाराज यांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी आहे असे ठणकावून सांगत ते म्हणाले की, राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गद्दारी करत असेल तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही हे राज्य देवा भाऊचे राज्य आहे या राज्यामध्ये हिंदुत्वाच्या विरोधातील एकही शक्ती एकवटू शकणार नाही असा इशारा आचार्य भोसले यांनी दिला.

आमदार अमोल खताळ काय म्हणाले

आ‌. खताळ म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील जनतेने शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्याचा आमदार केला हे तुम्हाला सहन होत नाही. म्हणून तुमचे बगलबच्चे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणाऱ्या संग्राम बापू महाराज भंडारे यांच्यावर तुम्ही पगारी कामगार पाठवून हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे येथून पुढे सहन केले जाणार नाही. संगमनेरला गेली ४० वर्ष तुम्ही महापुरुषांची जयंती साजरी करू शकले नाही. परंतु आम्ही सर्व महा पुरुषांच्या जयंती साजरी करू लागलो. तेव्हा तुम्हाला एवढा पोटसुळ का उठला आहे. असा सवाल उपस्थित करत धर्माच्या विरुद्ध आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करत आम्ही अजिबात गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तुम्हाला मागेपुढे फिरायला कर्मचारी लागतात. तुम्ही मोकळे जनतेमध्ये जाऊन दाखवा. तुम्ही आता पुणे – नाशिक आणि मुंबई इकडेच फिरा. तुमची संगमनेरकरांना गरज नाही. तुम्ही धर्म सत्तेला भेदण्याचा प्रयत्न करू नका. जर केला तर तुम्हाला हिंदुत्ववादी जनता ठोकल्याशिवाय राहणार नाही. संगमनेरकर जनतेने तुमचा पराभव केला आहे, तो तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारा. आम्हाला धर्माच्या आणि संस्काराच्या गोष्टी शिकू नका. महाराजांनी काय बोलायचे आणि काय नाही बोलायचं हे तुम्ही सांगू नका. ४० वर्षात तुम्ही काय केलं याचे तुम्ही आत्मपरीक्षण करा. या तालुक्यातील भीती व दहशत विधानसभेच्या निवडणुकीतच संपली आहे. त्यामुळे तुम्ही आता मोकळे पणाने फिरत आहात. या तालुक्यातील चाळीस वर्षातील दहशत आम्ही मोडून काढली आहे, हे तुम्हाला सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या कारणाने हिंदुत्ववाद्यांना त्रास देण्याचे काम करत आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्व सामान्य जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार खताळ यांनी दिला.

येथून पुढे संगमनेर शहर आणि तालुक्यात संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन ठेवले जाईल, त्यावेळी कोण त्याला विरोध करतो तेच पाहू असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, गुलाब भोसले, गोकुळ दिघे, आमदार अमोल खताळे यांच्या पत्नी नीलम खताळ, शहराध्यक्ष पायल ताजणे, रेखा गलांडे, माजी शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, रवी महाराज पिंपळ गावकर, विश्वनाथ महाराज नवले, दुर्गावाहिनी संयोजक अनिता एकबोटे, सुरेश कालडा, ऍड संग्राम जोंधळे, स्वप्नील राऊत, ज्ञानेश्वर थोरात, संजय पानसरे, डॉ महेंद्र कोल्हे, भिमराज चत्तर, रोहित चौधरी, प्रवीण कानवडे आदींनी दिला आहे.

Leave a Comment