पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
बाळासाहेब चांदेरे हे ठाकरे गटाचे पुण्यातील मोठे नेते आहेत. भोर, पुरंदर आणि हवेली या तीन तालुक्यांची त्यांच्याकडे जबाबदारी होती. या तिन्ही विभागाचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
त्यांनीच बंड केल्याने ठाकरे गटाची पुणे जिल्ह्यात मोठी कोंडी झाली आहे. बाळासाहेब चांदरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत
