मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमीतीच्या बैठक पार पडल्या नंतर सरकारकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आंदोलनावर ठाम असून ते सध्या मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहे.
अशातच या आंदोलनाच्या अनुषंगाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) मंत्रीमंडळ उपसमित चे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil) यांचा मनोज जरांगें ना फोन आल्याची माहिती समोर आली आहे . तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक शिष्ट मंडळ शिवनेरी इथे चर्चे साठी येणार असल्या ची माहिती स्व:त मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे .
दरम्यान, काल झालेल्या उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत सगे सोयरे बाबत ज्या मागण्या आहेत, त्याबाबत आम्ही चर्चा केल्याचे विखे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणावरील शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. मनोज जरांगेंनी याबाबतची मागणी केली होती. ती मागणी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत मान्य झाली आहे. असेही ते म्हणाले होते. दरम्यान आजच्या शिवनेरी इथे शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार असून यात काही तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणारआहे.
