दौंड(DSNews24) तालुक्यातील हिंगणीबेर्डी ग्रामपंचायत हद्दीमध्ये दोन महसुली गावे असल्याने तसेच दोन गावातील अंतर जवळपास 6 किलोमीटर येत असलेने हिंगणी बेर्डी याठिकाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्रास सहन करावा लागत होता. तसेच हिंगणी बेर्डी काळेवाडी या गावातील रहिवाशांची अनेक दिवसापासून विभक्त ग्रामपंचायत व्हावी म्हणून शासन दरबारी पाठपुरवा चालू होता.
हे गावे विभक्त होवून गावाचा विकास व्हावा यासाठी हिंगणी बेर्डी काळेवाडी महसूल गावे असणारी ग्रामपंचायत आता महसुली गावानुसार ग्रामपंचायत विभाजन हिंगणी बेर्डीमधून महसूल काळेवाडी गाव होणेसाठी उपमुख्यमंत्री ,पुणे जिल्हा चे पालकमंत्री अजितदादा पवार, तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल, दौंड शुगर संचालक मा.जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे पाटील यांच्या माध्यमातून दिनांक-१४ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाने अध्यादेश काढून हिंगणी बेर्डी ग्रामपंचायत मधून काळेवाडी निर्माण झाल्याचे जाहीर केले.
यावेळी लक्ष दिल्याने सरपंच, उपसरपंच ,सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या मागणीनुसार परमेश्वर रंगनाथ गायकवाड यांचा विभाजनाचा अर्ज सादर करून त्यांनी वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा राज्याचे उपमुख्यमंत्री ,पुणे जिल्हाचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार साहेब ,तालुक्याचे आमदार मा. राहुलदादा कुल ,व दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे पाटील यांचा पेढे भरून सर्व ग्रामस्थांनी त्यांचं आभार मानत त्यांना धन्यवाद देत त्यांचा शाल ,पुष्पगुच्छ ,श्रीफळ देवून सन्मान केला. त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं गेलं.दादांनी व बाबांनी सर्वांचं अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गावातील सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी श्री.परमेश्वर रंगनाथ गायकवाड तसेच ग्रामपंचायत अधिकारी सौ.शितल कापरे यांनी विशेष प्रयत्न केले.
