रमेश फिरोदिया महाविद्यालयातील प्रा. गणेश कुलकर्णी सेट परीक्षा उत्तीर्ण

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जुन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सेट (राज्यस्तरीय पात्रता) परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. गणेश चंद्रकांत कुलकर्णी हे वाणिज्य विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. अथक प्रयत्नातून त्यांनी हे यश मिळवले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेशजी फिरोदिया, शंकरराव पाटील खेमनर, बाजीराव पाटील खेमनर, दीपकजी फिरोदिया तसेच महाविद्यालयाचे प्राचार्या प्रो. डॉ.हेमलता राठोड ,उपप्राचार्य डॉ.सचिन घोलप, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.रंजित गिरी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment