मांडवे बुद्रुकमध्ये “त्या” घटनेने घबराट, रऊफ शेख यांनी केले “हे” आवाहन 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक परिसरात चोरट्यांनी चांगलाच धूमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी धुळगंड वस्तीवर मध्यरात्री भामबाई गोपाळा धुळगंड या आज्जीबाई झोपेत असताना चोरट्यांनी त्यांच्या नाकातील नथणीच लांबविली. तसेच घरात शिरून उचकापाचक केली.

तसेच शेख वस्तीवर याच चोरट्यांनी इब्राहिम शेख यांच्या घराची पाठीमागची खिडकी तोडून घरात शिरून चोरी केली. तसेच इतर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. या चोरट्यांच्या धुमाकूळामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मंगळवारी रात्री देखील काही भागात अनोळखी लोकं दिसल्याने गावातील तरुण व जागरुक नागरिक हे गस्त घालत होते.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी मांडवे गावात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केलीय. तसेच चोर्‍या झालेल्या नागरिकांच्या घरी भेट देत त्यांना धीर दिलाय.

यावेळी रऊफ शेख यांनी घारगावचे पोलीस निरिक्षक हेमंत थोरात यांच्याशी फोनवर संवाद साधत या चोर्‍यांचा तपास लावण्याची मागणी केली व ग्रामस्थांच्या मागणीनुसार या भागातील रात्रीची गस्त वाढवण्याच्या सुचना केल्या. यावेळी रऊफ शेख यांनी आमदार अमोल खताळ व प्रशासन ग्रामस्थांच्या पाठिशी असुन नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले.

यावेळी रऊफ शेख यांच्या समवेत कायदा सेलचे जिल्हा संयोजक ॲड. अमित धुळगंड, नाना पाटील धुळगंड, अमिर शेख, संतोष बिडकर उपस्थित होते.

Leave a Comment