पुणे (DSNews24/किरण पुरी) नुकतेच सहायक प्राध्यापक पदासाठी जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सेट (राज्यस्तरीय पात्रता) परीक्षेचा निकाल लागला आहे. या परिक्षेत संतोष शिवप्रसाद भारती यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ते कंठेश्वर, ता. पूर्णा, जि. परभणी येथील रहिवासी आहे.
संतोष भारती हे आदर्श शिक्षक शिवप्रसाद भारती यांचे ज्येष्ठ पुत्र असून, ते एक इंजिनिअर, वकील आणि शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपली प्रतिभा सिद्ध करत बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली आहे. तसेच त्यांच्या या यशामध्ये त्यांची मेहनत, सातत्य, आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा स्पष्टपणे जाणवते. त्यांनी सेट परीक्षेत मिळवलेले यश भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
या यशाबद्दल कुटुंबीय, सहकारी, मित्रमंडळी आणि शिक्षणविषयक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
