नगर – साकूर – शिर्डी बससेवा सुरू करण्यासाठी रऊफ शेख यांच मोठं पाऊल 

अहिल्यानगर(DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील साकूर सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव असुन या भागातील नागरिकांना अहिल्यानगर व शिर्डी या भागात येण्या-जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रशाशांची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ही बससेवा तातडीने सुरू करण्यात यावे याबाबतचे निवेदन व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ. अमोल खताळ यांचे शिफारस पत्र अहिल्यानगरचे एसटी विभागीय नियंत्रक यांना भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी दिलंय. यावेळी समवेत भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी उपस्थित होते.

अहिल्यानगर हे जिल्ह्याचे ठिकाण असून विविध शासकीय कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी कायमच जावे लागते. मात्र नगरला ये – जा करण्यासाठी बससेवाच नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. तसेच लोणी, शिर्डी व कोपरगाव कडे जाण्यासाठी आश्वी मार्गे जवळचा रस्ता असतानाही बससेवा नसल्याने संगमनेरहुन जावे लागते.

सदर या दोन्ही मार्गावर बससेवा नसल्याने प्रवाशांच्या गैरसोयीची दखल घेत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांचे लक्ष वेधले. याबाबतचे निवेदन श्री. शेख यांनी अहिल्यानगर येथील एसटी विभागीय नियंत्रक यांची भेट घेत सर्व वस्तूस्थिती सांगितली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन लवकरच याबाबात कार्यवाही करु असे आश्वासन यावेळी दिले.

Leave a Comment